Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Aakhada
मुंबई | आखाडा विशेष प्रतिनिधी : आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीमधील जागावाटपाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीने आपल्या घटक पक्षांमध्ये जागांचे वाटप निश्चित केले असून यामध्ये काही जागांवर जुन्याच पक्षांना प्राधान्य देण्यात आले आहे, तर काही जागांवर अदलाबदल करण्यात आली आहे. भाजपच्या वाट्याला सर्वाधिक ११ जागा महायुतीमध्ये नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्वाधिक जागांवर आपला दावा मजबूत केला आहे. यामध्ये सोलापूर, जळगाव, धाराशिव-लातूर-बीड, भंडारा गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती आणि नागपूर या आपल्या हक्काच्या जागा भाजपने स्वतःकडेच राखल्या आहेत. याशिवाय, पूर्वी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकडे असलेल्या काही जागा खेचून आणण्यात भाजपला…
धरणगाव | (आखाडा नेटवर्क) : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरातील चिंतामणी मोरया परिसरात चोरट्यांच्या टोळीने अक्षरशः हैदोस घातला असून, आता या टोळीचे अंगावर काटा आणणारे एक धक्कादायक सीसीटीव्ही (CCTV) फुटेज समोर आले आहे. पहाटेच्या सुमारास एका महिलेचा पाठलाग करणाऱ्या या टोळीमुळे संपूर्ण धरणगाव शहरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तोंड बांधलेले ४ चोरटे आणि तो थरार… काही दिवसांपूर्वी याच परिसरात तोंडाला काळे मास्क (रुमाल) बांधलेले चार चोरटे फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. मात्र, आता समोर आलेल्या नव्या फुटेजने नागरिकांच्या चिंतेत भर घातली आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास एक महिला आपल्या घराच्या दिशेने जात असताना,…
जळगाव | (आखाडा नेटवर्क) : गेल्या अनेक दिवसांपासून कडक उन्हाळा, अंगाची लाहीलाही करणारे तापमान आणि वाढत्या उकाड्याने त्रस्त असलेल्या जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या जळगावकरांची प्रतीक्षा आता अखेर संपणार असून, जिल्ह्यात पुढील तीन दिवस जोरदार वादळासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ५ जूनपर्यंत ढगाळ वातावरण हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, उद्यापासून म्हणजेच १ जून ते ५ जून या काळात संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहील. या कालावधीत हवामानात मोठे बदल होणार असून, मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. ताशी ४० ते ५० किमी वेगाने वाहणार वारे या हवामान बदलादरम्यान जिल्ह्यात ताशी ४० ते…
आखाडा लाईव्ह । जळगाव (विशेष प्रतिनिधी) : जळगाव शहरात सध्या ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात निकृष्ट दर्जाचे रस्ते बनत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार केल्या जात असतानाही प्रशासन ढिम्म आहे. भ्रष्टाचाराचा असाच एक धक्कादायक आणि कळस गाठणारा प्रकार शहरातील बजरंग बोगदा परिसरात उघडकीस आला आहे. या ठिकाणी रात्रीच्या अंधारात घाईघाईने बनवण्यात आलेला डांबरी रस्ता चक्क दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक नागरिकांनी हाताने उखडून दाखवला. या प्रकारामुळे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा (PWD) अत्यंत भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. रात्रीतून थातूरमातूर काम, सकाळी पोलखोल! मिळालेल्या माहितीनुसार, बजरंग बोगदा परिसरात रस्ता डांबरीकरणाचे काम अत्यंत घाईगडबडीत आणि…
जळगाव/ठाणे (आखाडा नेटवर्क) : आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेसाठी एका नव्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र आणि अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांना शिवसेनेकडून (शिंदे गट) मैदानात उतरवले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याने चौधरी यांच्या नावाचा विचार गंभीरतेने सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. शिंदे पिता-पुत्रांचे विश्वासू शिलेदार सुनील चौधरी हे मूळचे जळगावचे असले तरी त्यांनी ठाणे जिल्ह्यात आपल्या राजकीय कौशल्याच्या जोरावर मोठी पकड निर्माण केली आहे. राज्याचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे…
जळगाव (आखाडा नेटवर्क): महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट होऊ पाहणाऱ्या गावांच्या विकासाचा मार्ग आता अधिक प्रशस्त होणार आहे. जळगाव शहरालगत असलेल्या मोहाडी, कुसुंबा, निमखेडी आणि सावखेडा या गावांना लवकरच ‘शहरी’ ओळख मिळण्याची दाट शक्यता आहे. यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे, येथील जमिनींचा पारंपरिक ७/१२ उतारा आता कायमचा इतिहासजमा होणार असून, त्याऐवजी ग्रामस्थांना अधिकृत ‘प्रॉपर्टी कार्ड’ (मिळकतपत्रिका) दिले जाणार आहे. यासह वरील आव्हाणे मोहाडी, कुसुंबा आणि सावखेडा या चार गावांचा समावेश मनपा हद्दीत करण्याचाही हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत नागरिकांना होणार ‘हे’ मोठे फायदे : राज्य शासनाच्या या महत्त्वपूर्ण धोरणामुळे महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील वाढीव गावांना आणि तेथील नागरिकांना मोठा फायदा…
जळगाव (आखाडा नेटवर्क) : सध्या कडक उन्हाळा असला तरी आगामी काळात जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. जानेवारी महिन्यात मुदत संपलेल्या आणि सद्यस्थितीत प्रशासक राजवटीखाली असलेल्या जिल्ह्यातील तब्बल ७९१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या ऑगस्ट महिन्यात होणार आहेत. ऐन पावसाळ्यात ग्रामीण भागातील हा राजकीय आखाडा रंगणार असल्याने जिल्हाभरात आतापासूनच हालचालींना वेग आला आहे. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुकांसाठी १२ जून रोजी ग्रामपंचायत सदस्यांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर १० जुलै रोजी अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षित जागांची अधिकृत घोषणा केली जाईल. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल आणि ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्ष मतदानाचा…
जळगाव (पंकज पाटील) : गेल्या महिनाभरापासून जळगाव जिल्ह्यातील शेतकरी खंडित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयावर एक आगळेवेगळे ठिय्या आंदोलन करण्यात आले. राजकीय पक्षांचा आक्रमक पवित्रा आणि शेतकऱ्यांचा वाढता दबाव यापुढे अखेर वीज वितरण कंपनीला नमावे लागले असून, जळगाव ग्रामीण व चाळीसगावसह संपूर्ण जिल्ह्यात सलग ८ तास वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे लेखी आश्वासन महावितरणने दिले आहे. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आणि कायदेशीर इशारा आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या वतीने महावितरणसमोर दोन प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या: १. शेतकऱ्यांना शेतीसाठी कोणत्याही खंडेशिवाय सलग १० तास वीजपुरवठा मिळालाच पाहिजे. २. विद्युत…
जळगाव (नचिकेत चौधरी) : जिल्हाची प्रमुख कृषी ओळख असलेल्या आणि जी.आय. मानांकन (GI Tag) प्राप्त ‘जळगाव केळी’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जळगावच्या केळीला जागतिक बाजारपेठेत सक्षमपणे पोहोचवण्यासाठी आणि निर्यात साखळीतील तांत्रिक बाजू बळकट करण्यासाठी केंद्र सरकारच्या विशेष पथकाने आज जिल्ह्याचा दौरा केला. दिवसभरात जिल्ह्यातील निर्यात पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात एक उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न झाली. केंद्रीय व राज्य पातळीवरील तज्ज्ञांची उपस्थिती : या महत्त्वपूर्ण बैठकीत केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यामध्ये ‘एनसीसीडी’चे (NCCD) सीओओ श्री. आशिष फोतेदार व सल्लागार श्री. प्रितम सरकार,…
जळगाव (मंगेश चौधरी) : राज्यात आगामी विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुतीच्या जागावाटपात जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट) यांच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशातच, शिवसेनेचे युवा नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आले असून नव्या समीकरणांची नांदी सुरू झाली आहे.सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि कामाचा दांडगा अनुभव :पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा राजकीय वारसा लाभलेले प्रतापराव पाटील यांनी गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. केवळ वारशावर विसंबून न राहता त्यांनी वैयक्तिक कार्यशैली, दांडगा जनसंपर्क आणि कुशल संघटन…

