Close Menu
AakhadaAakhada
  • Home
  • सामाजिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • क्रीडा
  • पर्यावरण
  • मनोरंजन
  • व्यापार-उद्योग
  • शैक्षणिक
  • सांस्कृतिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मा. श्री. नवलसिंग राजे पाटील यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण; खान्देशातील समाजकार्याची पंजाबमध्ये दखल!

September 15, 2026

ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडणार? १५ हजारहून अधिक गावांमध्ये राजकीय हालचालींना लागणार ‘ब्रेक’

July 10, 2026

आखाडा न्यूज | विशेष वृत्त : अपात्र संचालकांकडून भरतीचे निर्णय? जळगाव जिल्हा बँकेच्या शिपाई भरतीवर प्रश्नचिन्ह

July 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
AakhadaAakhada
Button
  • Home
  • सामाजिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • क्रीडा
  • पर्यावरण
  • मनोरंजन
  • व्यापार-उद्योग
  • शैक्षणिक
  • सांस्कृतिक
AakhadaAakhada
Home»क्रीडा»राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मा. श्री. नवलसिंग राजे पाटील यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण; खान्देशातील समाजकार्याची पंजाबमध्ये दखल!
क्रीडा

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मा. श्री. नवलसिंग राजे पाटील यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण; खान्देशातील समाजकार्याची पंजाबमध्ये दखल!

नामदार गुलाब भाऊंच्या या नम्र कार्यकर्त्याची राष्ट्रीय स्तरावर दखल
Team AakhadaBy Team AakhadaSeptember 15, 2026
WhatsApp Facebook Twitter Telegram

आखाडा । (नचिकेत चौधरी) जळगाव : सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारे, महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांचे स्वीय सहाय्यक मा. श्री. नवलसिंग राजे पाटील यांच्या कार्याची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. पंजाब येथे आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी त्यांना ‘प्रमुख अतिथी’ (Chief Guest) म्हणून विशेष आमंत्रण देण्यात आले आहे.

गुर्जर समाजातील तसेच खान्देशातील युवकांना क्रीडा क्षेत्रात हक्काचा मंच मिळवून देण्यासाठी नवलसिंग राजे पाटील यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. जळगाव शहरातील ‘GPL’, चोपडा येथील ‘VGCL’ आणि सुरत येथील ‘GSPL’ क्रिकेट लीगसह अनेक छोट्या-मोठ्या स्पर्धांना नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रसंगी स्वतःच्या खिशातून आर्थिक व सर्वतोपरी मदत करून त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. युवकांना संघटित करणे, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या जनहितार्थ कार्याची प्रेरणा देणे आणि दादासो प्रतापराव पाटील यांच्या कार्याचा लेखाजोखा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.

वैद्यकीय उपचारांची मदत असो वा पोलीस स्टेशनमधील अडचणीचे काम, अडल्या-नडल्यांच्या हाकेला धावून जाणारे ‘गुलाब भाऊंचे नम्र शिपाई’ म्हणून त्यांची ओळख आहे. प्रत्येक नागरिकाच्या सुख-दुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहणाऱ्या नवलसिंग राजे पाटील यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाची पावती आजवर खान्देशातील घराघरांत पोहोचली होती, परंतु आता पंजाबमधील क्रीडा प्रेमींनीही त्यांच्या या कार्याचा गौरव केला आहे.

स्पर्धेचे नियोजन:

  • स्पर्धेचे ठिकाण: गाव – बागोवाल, तालुका – बालाचौर, जिल्हा – नवांशहर (पंजाब)

  • विशेष स्वरूप: राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा

नामदार गुलाब भाऊंच्या या नम्र कार्यकर्त्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याने खान्देशातील सर्व खेळाडू, कार्यकर्ते व क्रीडाप्रेमींमध्ये अभिमानाची आणि आनंदाची लाट पसरली आहे. त्यांच्या हातून असेच निरंतर समाजकार्य व क्रीडा क्षेत्राची सेवा घडत राहो, या शब्दांत राजकीय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
Team Aakhada
  • Website

Related Posts

जळगाव महापालिकेत भाकरी फिरली! आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली; आयएएस आदित्य जीवने सांभाळणार धुरा

June 9, 2026

जळगावात गुरव समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न; प्रा. किशोर धाकतोड यांचे मार्गदर्शन

June 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

जिल्ह्यातील भाजपचा नेता कोण..?, ज्याने गिरीश महाजन , मंगेश चव्हाण यांना चीतपट केले…

June 7, 20265,333

जिल्हा बँक अडचणीत: नियमबाह्य कारभाराच्या तक्रारीची दखल, सहकार आयुक्तांकडून तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

July 3, 2026353

ब्रेकिंग न्यूज: जळगाव जिल्हा बँकेकडून शेतकरी कर्जमाफीत बेकायदेशीर व्याज वसुली; गुलाबराव देवकरांवर १० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप!

June 17, 2026334

मोहाडीकर शांत, म्हणून पाहू नका अंत, रखडलेल्या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला ७ दिवसांचा ‘अल्टिमेटम’

July 3, 2026249
Don't Miss
क्रीडा

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मा. श्री. नवलसिंग राजे पाटील यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण; खान्देशातील समाजकार्याची पंजाबमध्ये दखल!

By Team AakhadaSeptember 15, 202611

आखाडा । (नचिकेत चौधरी) जळगाव : सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारे, महाराष्ट्र राज्याचे…

ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडणार? १५ हजारहून अधिक गावांमध्ये राजकीय हालचालींना लागणार ‘ब्रेक’

July 10, 2026

आखाडा न्यूज | विशेष वृत्त : अपात्र संचालकांकडून भरतीचे निर्णय? जळगाव जिल्हा बँकेच्या शिपाई भरतीवर प्रश्नचिन्ह

July 9, 2026

ब्रेकिंग न्यूज: अमळनेरमध्ये काळाचा घाला; खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन सिंधी तरुण मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

July 7, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
Our Picks

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मा. श्री. नवलसिंग राजे पाटील यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण; खान्देशातील समाजकार्याची पंजाबमध्ये दखल!

September 15, 2026

ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडणार? १५ हजारहून अधिक गावांमध्ये राजकीय हालचालींना लागणार ‘ब्रेक’

July 10, 2026

आखाडा न्यूज | विशेष वृत्त : अपात्र संचालकांकडून भरतीचे निर्णय? जळगाव जिल्हा बँकेच्या शिपाई भरतीवर प्रश्नचिन्ह

July 9, 2026
Most Popular

जिल्ह्यातील भाजपचा नेता कोण..?, ज्याने गिरीश महाजन , मंगेश चव्हाण यांना चीतपट केले…

June 7, 20265,333

जिल्हा बँक अडचणीत: नियमबाह्य कारभाराच्या तक्रारीची दखल, सहकार आयुक्तांकडून तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

July 3, 2026353

ब्रेकिंग न्यूज: जळगाव जिल्हा बँकेकडून शेतकरी कर्जमाफीत बेकायदेशीर व्याज वसुली; गुलाबराव देवकरांवर १० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप!

June 17, 2026334
© 2026 Aakhada Live. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.