Author: Team Aakhada

आखाडा | (विशेष प्रतिनिधी) मुंबई: राज्यातील ग्रामीण राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या संदर्भात एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. बहुप्रतीक्षित प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असली, तरी मतदारयाद्यांच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमामुळे राज्यातील तब्बल १५ हजार ६३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या अनपेक्षित घडामोडीमुळे गावोगावी निवडणुकीची जोरदार तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. नेमके काय आहे कारण? २०२४, २०२५ आणि २०२६ या वर्षांमध्ये मुदत संपलेल्या हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुका यंदाच्या वर्षात पार पडतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. राज्य निवडणूक आयोगाने त्यानुसार प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीची…

Read More

आखाडा | जळगाव : राज्य शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील चतुर्थश्रेणी शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करत नवीन पूरक शासनपत्र जारी केले आहे. या निर्णयानुसार शिपाई पदासाठी ऑनलाइन भरती रद्द करून ऑफलाइन पद्धतीने लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार असून स्थानिक उमेदवारांना १०० टक्के प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार शिपाई पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण निश्चित करण्यात आली असून उमेदवारांची निवड ७० गुणांच्या लेखी परीक्षा व ३० गुणांच्या मौखिक मुलाखतीच्या आधारे होणार आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहावी म्हणून परीक्षा तज्ज्ञ संस्थेमार्फत घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक…

Read More

आखाडा | अमळनेर: येथील चोपडा रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ असलेल्या खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुण मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण अमळनेर शहरासह सिंधी कॉलनी परिसरावर शोककळा पसरली आहे. मित्रांसोबत पोहण्याचा बेत ठरला जीवघेणा मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अमळनेर येथील सिंधी कॉलनी परिसरातील तीन तरुण मित्र चोपडा रस्त्यावरील रेल्वे ब्रिज जवळील खदानीच्या साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघेही जण खोल पाण्यात बुडू लागले. आजूबाजूला असलेल्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. तिन्ही तरुणांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला. मृतांची नावे: अपघाताची माहिती मिळताच…

Read More

आखाडा लाईव्ह | पुणे : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बँकिंग रेग्युलेशन (सुधारणा) अधिनियम, २०२५ आणि आरबीआय (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँकेच्या संचालक मंडळावर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाने नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. काय आहे प्रकरण? झुरखेडा येथील लोकनियुक्त सरपंच सुरेशआप्पा गो. पाटील यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाबाबत सहकार विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाने आता तातडीने पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सहकार आयुक्तांचे तातडीने कार्यवाही करण्नियाचे निर्देश सहकार आयुक्तांनी नाशिक विभागीय सहनिबंधकांना संबंधित निवेदनावर…

Read More

आखाडा लाईव्ह | जळगाव : तालुक्यातील मोहाडी येथील मुख्य रस्त्याचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहे. रस्ते विकासकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन आणि कार्यादेश (Work Order) मिळूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. प्रशासनाच्या या अजब कारभारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, पुढील सात दिवसांत काम सुरू न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देण्याचा इशारा दिला आहे. कार्यादेश असूनही कामाकडे पाठ का? मिळालेल्या माहितीनुसार, मोहाडी येथील रस्त्यासाठी आवश्यक असणारी कायदेशीर प्रक्रिया गेल्या वर्षापासूनच पूर्ण झाली आहे. नियमानुसार कामाचा कार्यादेशही देण्यात आला आहे, तरीही संबंधित मक्तेदार कामाला सुरुवात करत नाही. प्रशासनाकडून मक्तेदारावर कोणतीही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची…

Read More

आखाडा लाईव्ह (भगवान सपकाळे) जळगाव: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मधील कथित नियमबाह्य कारभाराबाबतची तक्रार सहकार आयुक्तांनी गंभीरतेने घेतली आहे. लोकनियुक्त सरपंच सुरेशआप्पा गो. पाटील (झुरखेडा, ता. धरणगाव) यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी नाशिक येथील विभागीय सहनिबंधकांना तातडीने चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. नेमकी तक्रार काय? तक्रारदार सुरेशआप्पा पाटील यांनी ३० जून २०२६ रोजी सहकार आयुक्तांकडे सादर केलेल्या निवेदनात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजावर गंभीर ठपका ठेवला आहे. तक्रारीतील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत: कायद्याचे उल्लंघन : बँकेकडून बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम, २०२५ चे उल्लंघन. RBI मार्गदर्शक…

Read More

आखाडा | जळगाव/नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, २०१७ च्या नियमांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांकडून बेकायदेशीर व्याज वसुली केल्याप्रकरणी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मोठा दणका बसला आहे. नाशिक विभागाचे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) यांनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आज, १६ जून २०२६ रोजी नोटीस बजावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या पत्रात श्री. गुलाबराव बाबुराव देवकर यांच्यावर पदाचा गैरवापर करून १० कोटी रुपयांचे अवैध आर्थिक व्यवहार केल्याची गंभीर तक्रार असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. नेमके प्रकरण काय आहे? महाराष्ट्र शासनाने १३ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७९अ अन्वये एक महत्त्वपूर्ण आदेश काढला होता. या…

Read More

आखाडा | जळगाव : विधान परिषद निवडणुकीची धामधूम आणि राजकीय घडामोडी शिगेला पोहोचल्या असतानाच, जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. यावल नगरपालिकेच्या ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष छाया पाटील या लवकरच भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आज त्यांनी पती अतुल पाटील यांच्यासह जळगाव येथील भाजप कार्यालयात जात राज्याचे संकटमोचक आणि संकट निवारक मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याने या चर्चांना कमालीचे उधाण आले आहे. भाजप कार्यालयात बंद दाराआड खलबते! आज जळगाव येथील भाजप कार्यालयात छाया पाटील आणि त्यांचे पती अतुल पाटील अचानक दाखल झाले. त्यांनी थेट मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. या…

Read More

आखाडा | जळगाव : यावर्षी राज्यासह जळगाव जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाबाबत अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात पूर्वमान्सूनच्या सरी कोसळल्या असल्या तरी बहुतांश ठिकाणी अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कोणत्याही प्रकारची घाई न करता पुरेसा व सातत्यपूर्ण पाऊस झाल्यानंतरच खरीप पेरणी करावी, असे कळकळीचे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. दुबार पेरणीचे संकट टाळा जळगाव जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या केवळ दोन-चार सरींवर पेरणी करण्याचा मोह टाळणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या पावसानंतर दीर्घ खंड पडल्यास बियाण्यांची उगवण प्रभावित होते. परिणामी, भविष्यात दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊन बियाणे,…

Read More

आखाडा | जळगाव : विधानपरिषद निवडणुकीच्या रणांगणातून एक अत्यंत मोठी आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत आहे. निवडणूक रिंगणातील अपक्ष/बंडखोर उमेदवार रेशमाताई काळे यांनी अखेर आपली उमेदवारी जाहीरपणे मागे घेतली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदूभाऊ महाजन यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर निर्णय गेल्या काही दिवसांपासून रेशमाताई काळे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते ना. एकनाथराव शिंदे यांची भेट घेतली. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा धर्म पाळत, महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या सूचना रेशमाताई काळे यांना दिल्या. “महायुतीची ताकद वाढवण्यासाठी आणि पक्षाची…

Read More