Author: Team Aakhada

आखाडा | जळगाव : विधानपरिषद निवडणुकीच्या रणांगणातून एक अत्यंत मोठी आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत आहे. निवडणूक रिंगणातील अपक्ष/बंडखोर उमेदवार रेशमाताई काळे यांनी अखेर आपली उमेदवारी जाहीरपणे मागे घेतली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदूभाऊ महाजन यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर निर्णय गेल्या काही दिवसांपासून रेशमाताई काळे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते ना. एकनाथराव शिंदे यांची भेट घेतली. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा धर्म पाळत, महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या सूचना रेशमाताई काळे यांना दिल्या. “महायुतीची ताकद वाढवण्यासाठी आणि पक्षाची…

Read More

जळगाव: जळगावच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला गती आलेली असतानाच, जळगावच्या राजकारणातील सस्पेन्स कमालीचा वाढला आहे. अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या रेश्मा काळे अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्या आहेत. दुसरीकडे, जळगावातील एका नामांकित हॉटेलमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक सुरू झाली असून, यामुळे ‘ऑपरेशन माघार’ सक्रिय झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. हॉटेलमध्ये महायुतीच्या नेत्यांची गुप्त बैठक मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगावातील हॉटेलमध्ये महायुतीचे सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी एकत्र आले आहेत. या बंद दाराआड सुरू असलेल्या बैठकीत बंडखोरी शमवण्यासाठी आणि मित्रपक्षांमधील समन्वय साधण्यासाठी काय रणनीती आखायची, यावर खलबतं सुरू आहेत. विरोधकांचे मन…

Read More

आखाडा | (Exclusive) जळगाव : नाशिक मध्ये भाजपने शिवसेना विरोधात बंडखोरी केल्यानंतर, नाशिकच्या बदला फेडण्यासाठी शिवसेनेने जळगाव मध्ये भाजप उमेदवाराविरोधात रेशमा काळे यांना उभे करत भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. तसेच जोपर्यंत नाशिकमध्ये भाजप बंडखोर उमेदवार गोकुळ गीते माघार घेणार नाहीत, तोपर्यंत जळगाव मध्ये ही रेश्मा काळे या माघार घेणार नसतेची भूमिका शिवसेनेने घेतली होती.. अखेर आता भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांच्या शिष्टाईनंतर नाशिक मध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी जाहीर माघार घेतली आहे. त्यानंतर आता जळगाव मध्येही शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे या माघार घेणार असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. शुक्रवार, १२…

Read More

आखाडा | जळगाव : दि. ११ जून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांकडून लाभ मिळेपर्यंत व्याज आकारणी करू नये, असा शासनाचा स्पष्ट आदेश असतानाही जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने व्याज वसुली केल्याचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने विभागीय सहनिबंधक, नाशिक यांना संबंधित बँकेविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. झुरखेडा (ता. धरणगाव) येथील लोकनियुक्त सरपंच श्री. सुरेशआप्पा गो. पाटील यांनी या प्रकरणी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शासनाने या प्रकरणाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला. शासनाच्या ११…

Read More

आखाडा | जळगाव : दि. ११ जून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांकडून लाभ मिळेपर्यंत व्याज आकारणी करू नये, असा शासनाचा स्पष्ट आदेश असतानाही जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने व्याज वसुली केल्याचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने विभागीय सहनिबंधक, नाशिक यांना संबंधित बँकेविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. झुरखेडा (ता. धरणगाव) येथील लोकनियुक्त सरपंच श्री. सुरेशआप्पा गो. पाटील यांनी या प्रकरणी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शासनाने या प्रकरणाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला. शासनाच्या…

Read More

आखाडा | जळगाव : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांच्या संभाव्य माघारीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, ही माघार केवळ राजकीय समजुतीपोटी आहे की त्यामागे पडद्याआड कोणती ‘शक्ती’ कार्यरत आहे, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. महायुतीच्या नेत्यांकडून एका बाजूला मनधरणीचे प्रयत्न सुरू असतानाच, दुसरीकडे समोर आलेल्या एका शासकीय पत्रामुळे या संपूर्ण प्रक्रियेत ‘दबाव तंत्राचा’ वापर तर झाला नाही ना? असा संशय बळावला आहे. दरम्यान, गीते यांनी जर जाहीर माघार घेतली तर जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे या देखील माघार घेतात याकडे लक्ष लागले आहे. कारण, काळे यांनी प्रचार…

Read More

आखाडा | जळगाव : जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. सध्या केवळ ‘मार्च ते जुलै’ या कालावधीत वादळामुळे नुकसान झाल्यासच पीकविम्याची भरपाई दिली जाते. मात्र, आता वर्षातील कोणत्याही काळात वादळामुळे केळीचे नुकसान झाले, तरी उत्पादकांना भरपाई मिळावी, असा महत्त्वपूर्ण बदल विमा निकषांमध्ये करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विमा कंपन्यांना दिल्या आहेत. मुंबईत मंत्रालयात विशेष बैठक जिल्ह्यातील रावेर आणि मुक्ताईनगरसह अनेक तालुक्यांमध्ये नुकत्याच झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी हे नुकसान १०० टक्क्यांवर पोहोचले आहे. या भीषण परिस्थितीची दखल घेत, १० जून रोजी मुंबईत मंत्रालयात एका विशेष बैठकीचे…

Read More

आखाडा | मुंबई/दिल्ली : पंजाब दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’बाबत केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महाजन यांच्या या विधानावर भारतीय जनता पक्षाच्या (BJP) केंद्रीय नेतृत्वाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांचे ते वक्तव्य म्हणजे पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट करत भाजपने या वादातून स्वतःला बाजूला केले आहे. नक्की काय घडलं? अमृतसरमध्ये १९८४ साली झालेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ला नुकतीच ४२ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी “ऑपरेशन ब्लू स्टार हा एक काळा…

Read More

आखाडा | जळगाव : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गुटख्याची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि जळगाव पोलिसांनी संयुक्तपणे एक मोठी मोहीम फत्ते केली आहे. या धडक कारवाईत तब्बल २१ लाख ८१ हजार ६०० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. गुटख्याची वाहतूक करणारी पिकअप व्हॅन जप्त करण्यात आली असून, वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवस पाळत ठेवून फिल्मी स्टाईल पाठलाग अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार सध्या राज्यभरात अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विरोधात धडक मोहीम राबवली जात आहे.…

Read More

आखाडा | मुंबई: भाजपचे संकटमोचक आणि महाराष्ट्राचे ग्रामविकास व जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे आपल्या विधानांमुळे पुन्हा एकदा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अमृतसर येथील ‘दमदमी टाकसाल’च्या मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना महाजन यांनी १९८४ मधील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ या लष्करी कारवाईला “काळा दिवस” (Black Day) संबोधले आहे. तसेच, सुवर्ण मंदिरात मारल्या गेलेल्यांना “शहीद/हुतात्मे” म्हटल्याने महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सुवर्ण मंदिरावरील कारवाई चुकीची; अहमदशाह अब्दालीशी तुलना अमृतसरमध्ये ऑपरेशन ब्लू स्टारच्या ४२ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी हजेरी लावली होती. अशा कार्यक्रमात सहभागी होणारे ते देशातील कोणत्याही राज्य सरकारचे पहिलेच मंत्री ठरले आहेत. यावेळी…

Read More