Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Aakhada
आखाडा | जळगाव : जिल्ह्याची केळीची आगार मानल्या जाणाऱ्या रावेर तालुक्याला गुरुवारी (४ जून) दुपारी निसर्गाच्या प्रचंड कोपाचा सामना करावा लागला. दुपारी अचानक आलेल्या ढगफुटीसदृश पाऊस आणि ताशी ६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या भीषण वादळामुळे संपूर्ण तालुक्यात हाहाकार उडाला आहे. अवघ्या अर्ध्या तासात तब्बल १२० मिमी पावसाची नोंद झाली असून, वादळाच्या तीव्रतेमुळे तालुक्यातील हजारो हेक्टरवरील केळीच्या बागा अक्षरशः जमिनीवर कोसळल्या (भुईसपाट झाल्या) आहेत. यामुळे शेतकरी राजा पूर्णपणे खचला असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अवघ्या ३० मिनिटांत जलप्रलय! ४ जून रोजी दुपारच्या सुमारास रावेर शहर आणि परिसरात अचानक आकाश ढगांनी डवरून आले. काही समजण्याच्या आतच सोसाट्याचा वादळी वारा आणि…
आखाडा | विशेष प्रतिनिधी : आज (५ जून) जगभरात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात आणि जनजागृतीच्या विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. पर्यावरण संरक्षणाबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा संदेश देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. वाढते प्रदूषण, जंगलतोड, हवामानातील बदल, पाण्याची टंचाई आणि प्लास्टिक कचऱ्याचे वाढते संकट यामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ सरकारचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यंदाच्या पर्यावरण दिनानिमित्त विविध शासकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्था तसेच स्वयंसेवी संघटनांकडून वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पर्यावरण जनजागृती रॅली, प्लास्टिकमुक्ती अभियान आणि जलसंवर्धन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण…
आखाडा विशेष : महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या बुलंद आवाजाने, आक्रमक शैलीने आणि जनतेशी असलेल्या घट्ट नाळेमुळे एक अढळ स्थान निर्माण करणारे नेते, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे धडाडीचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील आज वयाची ६० वर्षे पूर्ण करत आहेत. त्यांच्या या षष्ट्यब्दीपूर्तीचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनालाही तब्बल ४५ वर्षे पूर्ण होत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातून येऊन, स्वतःच्या कर्तृत्वावर आणि लोकसंग्रहाच्या बळावर राज्याच्या मंत्रिमंडळात मानाचे स्थान मिळवण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास अत्यंत थक्क करणारा आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या या ४५ वर्षांच्या संघर्षमयी प्रवासावर टाकलेला हा एक विशेष दृष्टिक्षेप: १. सुरुवातीचा काळ आणि…
आखाडा | मुंबई: राज्यात गुटखा, पानमसाला आणि अन्न-औधधांमधील भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही. आपल्या कडक कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची धुरा सांभाळताच राज्यभरात कारवाईचा धडाका लावला आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही, असा कडक इशारा देत मुंढे यांनी आता थेट नागरिकांनाच तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी प्रशासनाकडून अधिकृत टोल फ्री क्रमांक आणि ई-मेल आयडी जारी करण्यात आला आहे. अनेकदा नागरिकांना अन्न किंवा औषधांमधील भेसळीबाबत कुठे तक्रार करावी हे माहीत नसते. हीच अडचण दूर करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना थेट तक्रार करण्यासाठी एक हक्काचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला…
आखाडा | मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ज्याची आतुरतेने प्रतीक्षा होती, तो मान्सून अखेर ४ जून रोजी दुपारी केरळमध्ये दाखल झाला आहे. हवामान अंदाज वर्तवणारी संस्था ‘स्कायमेट’चा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून, मान्सूनने वेळेत हजेरी लावली आहे. यंदा मान्सूनला ३ ते ४ दिवसांचा उशीर झाला असला, तरी त्याची सुरुवातीची गती अत्यंत समाधानकारक आणि वेगवान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किंवा नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही, अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ महेश पालावत यांनी दिली आहे. महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार? स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत मान्सून गोवा, कर्नाटक आणि तळ कोकणात प्रवेश करेल. तर १० जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. ८ जुलैपर्यंत…
आखाडा | मुंबई: महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाच्या १७ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया आता रंजक वळणावर पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यभरात प्रचंड राजकीय घडामोडी आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. बंडखोरांना शांत करण्यात महायुतीच्या नेत्यांना मोठे यश आले असून, संख्याबळ आणि अंतर्गत मतभेदांमुळे महाविकास आघाडीच्या (मविआ) काही उमेदवारांना माघार घ्यावी लागली आहे. या राजकीय घडामोडींनंतर १७ पैकी ५ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १२ जागांवर थेट लढत होणार आहे. बिनविरोध झालेल्या ५ जागांमध्ये सत्ताधारी महायुतीचे वर्चस्व राहिले असून यात शिवसेनेने २, राष्ट्रवादी काँग्रेसने २ आणि भाजपला १ जागा मिळाली आहे. ➔ या ५ जागांवर बिनविरोध विजय! अर्ज…
आखाडा लाईव्ह | जळगाव: शहरातील एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला तिच्याच मैत्रिणीने ड्रग्ज आणि सिगारेटच्या व्यसनात अडकवून एका तरुणाच्या जाळ्यात ओढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणाने तरुणीला दारू पाजून तिच्यावर कारमध्ये शारीरिक अत्याचार केले आणि तिचे नग्न फोटो काढून तिला वारंवार ब्लॅकमेल केल्याची माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात निर्मल दिनेश तिवारी (रा.प्रजापती नगर) , जय चौधरी (शिव कॉलनी) आणि गौरव पुरोहित यांच्याविरुद्ध ‘पोक्सो’ सह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, पिडीत तरुणी आणि सौम्या पवार या दोघी जळगावच्या सेंट टेरेसा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये एकत्र शिक्षण घेत होत्या. ऑक्टोबर २०२४ मध्ये सौम्या…
आखाडा लाईव्ह | जळगाव :अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देण्याचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात, याची प्रचिती देणारी एक धक्कादायक घटना जळगाव शहरात ३ जून रोजी समोर आली आहे. एका १५ वर्षीय मुलाने भरधाव वेगात कार चालवत रस्त्यावरून जाणाऱ्या तब्बल आठ ते नऊ नागरिकांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन दाम्पत्य आणि एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. नेमका अपघात कसा झाला? मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रामानंदनगर रस्त्यावर नेहमीसारखीच नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ होती. त्याचवेळी रामानंदनगरकडून काव्यरत्नावली चौकाच्या दिशेने एक कार अत्यंत वेगाने येत होती. कार चालवत असलेला…
जळगाव (मंगेश चौधरी) : जळगाव जवळील दापोरा शिवारात काल रात्री वाळू माफियांनी खाकी वर्दीची अब्रू चव्हाट्यावर आणत प्रशासकीय यंत्रणेला थेट चॅलेंज दिले. महसूल आणि पोलिसांचा तब्बल २५ ते ३० जणांचा फौजफाटा तैनात असतानाही, वाळू माफियांनी अधिकार्यांच्या डोळ्यादेखत जप्त केलेले डंपर पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी वाळू माफियांनी दापोरा गावातील स्थानिक नागरिकांवर तलवार, कुऱ्हाड आणि चॉपर यांसारख्या जीवघेण्या हत्यारांसह हल्ला चढवल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मध्यरात्री १ वाजेपर्यंत कारवाईचा थरार दापोरा व धानोरा शिवारात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उपसा सुरू असल्याची खात्रीशीर माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार महसूल विभागाचे…
आखाडा लाईव्ह Exclusive.. | जळगाव: विधान परिषदेच्या जळगावच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत सुरुवातीपासूनच मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर भाजपने ही जागा आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळवले असले तरी, उमेदवारी जाहीर करताना एक मोठा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. भाजपचे ‘संकटमोचक’ मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन आणि ‘रायझिंग स्टार’ आमदार मंगेश चव्हाण यांच्या पसंतीला डावलून, पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून निष्ठावान पदाधिकारी नंदकिशोर महाजन यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकण्यात आली आहे. डॉ. केतकी पाटील यांच्यासाठी वरिष्ठ नेत्यांचा मोठा आग्रह असतानाही, अचानक नंदकिशोर महाजन यांचे नाव कसे पुढे आले? यामागची ‘इनसाईड स्टोरी’ अतिशय रंजक आहे. डॉ. केतकी पाटील यांचे नाव मागे का पडले?…

