Close Menu
AakhadaAakhada
  • Home
  • सामाजिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • क्रीडा
  • पर्यावरण
  • मनोरंजन
  • व्यापार-उद्योग
  • शैक्षणिक
  • सांस्कृतिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जळगावात अल्पवयीन मुलाचा बेदरकारपणा; सुसाट कार अंगावर घालून ८ ते ९ जणांना उडवले

June 3, 2026

वाळू माफियांची पोलिसांसमोरच दादागिरी; दापोऱ्यात गावकऱ्यांना तलवार-कुऱ्हाडीचा धाक!

June 3, 2026

गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांचा आग्रह डावलून नंदकिशोर महाजन यांना मिळाली उमेदवारी…?

June 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
AakhadaAakhada
Button
  • Home
  • सामाजिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • क्रीडा
  • पर्यावरण
  • मनोरंजन
  • व्यापार-उद्योग
  • शैक्षणिक
  • सांस्कृतिक
AakhadaAakhada
Home»क्राईम»वाळू माफियांची पोलिसांसमोरच दादागिरी; दापोऱ्यात गावकऱ्यांना तलवार-कुऱ्हाडीचा धाक!
क्राईम

वाळू माफियांची पोलिसांसमोरच दादागिरी; दापोऱ्यात गावकऱ्यांना तलवार-कुऱ्हाडीचा धाक!

महसूल व पोलिसांच्या 'मॅनेजमेंट'वर गावकऱ्यांचा तीव्र संताप; दापोरा ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात
Team AakhadaBy Team AakhadaJune 3, 2026No Comments7 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव (मंगेश चौधरी) : जळगाव जवळील दापोरा शिवारात काल रात्री वाळू माफियांनी खाकी वर्दीची अब्रू चव्हाट्यावर आणत प्रशासकीय यंत्रणेला थेट चॅलेंज दिले. महसूल आणि पोलिसांचा तब्बल २५ ते ३० जणांचा फौजफाटा तैनात असतानाही, वाळू माफियांनी अधिकार्‍यांच्या डोळ्यादेखत जप्त केलेले डंपर पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी वाळू माफियांनी दापोरा गावातील स्थानिक नागरिकांवर तलवार, कुऱ्हाड आणि चॉपर यांसारख्या जीवघेण्या हत्यारांसह हल्ला चढवल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मध्यरात्री १ वाजेपर्यंत कारवाईचा थरार

दापोरा व धानोरा शिवारात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उपसा सुरू असल्याची खात्रीशीर माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार महसूल विभागाचे मंडल अधिकारी, तलाठी आणि पोलीस प्रशासनाचा २५ ते ३० जणांचा मोठा ताफा काल रात्री कारवाईसाठी दापोरा येथे दाखल झाला होता. मध्यरात्री १ वाजेपर्यंत महसूल आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे ही कारवाई करत होते. ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात होती. मात्र, कारवाई सुरू असतानाच वाळू माफियांनी थेट प्रशासकीय यंत्रणेसमोरच दादागिरी करत काही डंपर पळवून नेण्यात यश मिळवले.

ग्रामस्थावर जीवघेणा वार हुकला!

प्रशासकीय कारवाई सुरू असल्याचे पाहून दापोरे गावातील नागरिकही मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. गावकऱ्यांचा हा हस्तक्षेप पाहताच वाळू माफिया आणि त्यांच्या गुंडांनी थेट गावकऱ्यांनाच लक्ष्य केले. हातात नग्न तलवारी, कुऱ्हाडी आणि चॉपर घेऊन त्यांनी गावकऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली.

या गोंधळात एका वाळू माफियाने थेट एका ग्रामस्थावर जीवघेणा वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुदैवाने तो वार हुकला आणि मोठा अनर्थ टळला. या सशस्त्र दहशतीमुळे आणि माफियांच्या हिंसक रूपामुळे अखेर गावकऱ्यांना तिथून पळ काढावा लागला.

तालुका पोलीस स्टेशन ‘मॅनेज’ असल्याचा थेट आरोप

एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि महसूलचे वरिष्ठ अधिकारी हजर असतानाही वाळू माफिया एवढी हिंमत कशी करू शकतात? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. “जळगाव तालुका पोलीस स्टेशन हे पूर्णपणे वाळू माफियांसोबत मॅनेज झाले आहे. पोलिसांच्या मूकसंमतीनेच त्यांच्या देखत डंपर पळवले गेले आणि गावकऱ्यांवर हत्यारे उगारली गेली,” असा थेट आणि गंभीर आरोप दापोरा ग्रामस्थांकडून केला जात आहे. अधिकाऱ्यायांच्या अकार्यक्षमतेमुळे पोलिसांच्या भूमिकेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दापोरा गावात दहशत; आंदोलनाचा इशारा

या थरारक घटनेनंतर दापोरा गावात प्रचंड दहशतीचे आणि पर्यायाने तीव्र संतापाचे वातावरण आहे. कायद्याचा कोणताही धाक न उरलेल्या या वाळू माफियांची दादागिरी मुळापासून मोडून काढण्यासाठी आणि दोषींवर कठोर गुन्हे दाखल करण्यासाठी दापोरे गावातील नागरिक आता आक्रमक झाले असून मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

आता या संपूर्ण गंभीर प्रकरणात जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी माफियांसह ‘मॅनेज’ झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर काय कठोर पावले उचलतात, याकडे संपूर्ण जळगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team Aakhada
  • Website

Related Posts

रागाचा भडका! घरासमोर लघुशंका केल्याच्या वादातून तरुणीचा तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला

June 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांचा आग्रह डावलून नंदकिशोर महाजन यांना मिळाली उमेदवारी…?

June 3, 2026103

जळगावात अल्पवयीन मुलाचा बेदरकारपणा; सुसाट कार अंगावर घालून ८ ते ९ जणांना उडवले

June 3, 202677

विधानपरिषदेत शिवसेनेची माघार; प्रतापराव पाटलांचा ‘महायुती धर्म’ पाळत निवडणूक न लढवण्याचा निर्णय!

June 1, 202661

महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय: ३६ हजार कोटींची ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना’ मंजूर….

June 2, 202650
Don't Miss
क्राईम

जळगावात अल्पवयीन मुलाचा बेदरकारपणा; सुसाट कार अंगावर घालून ८ ते ९ जणांना उडवले

By Team AakhadaJune 3, 202677

आखाडा लाईव्ह | जळगाव :अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देण्याचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात, याची…

वाळू माफियांची पोलिसांसमोरच दादागिरी; दापोऱ्यात गावकऱ्यांना तलवार-कुऱ्हाडीचा धाक!

June 3, 2026

गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांचा आग्रह डावलून नंदकिशोर महाजन यांना मिळाली उमेदवारी…?

June 3, 2026

विधान परिषदेच्या धामधुमीत जिल्ह्यात होणार अनेक दिग्गजांचे पक्षांतर

June 3, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
Our Picks

जळगावात अल्पवयीन मुलाचा बेदरकारपणा; सुसाट कार अंगावर घालून ८ ते ९ जणांना उडवले

June 3, 2026

वाळू माफियांची पोलिसांसमोरच दादागिरी; दापोऱ्यात गावकऱ्यांना तलवार-कुऱ्हाडीचा धाक!

June 3, 2026

गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांचा आग्रह डावलून नंदकिशोर महाजन यांना मिळाली उमेदवारी…?

June 3, 2026
Most Popular

गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांचा आग्रह डावलून नंदकिशोर महाजन यांना मिळाली उमेदवारी…?

June 3, 2026103

जळगावात अल्पवयीन मुलाचा बेदरकारपणा; सुसाट कार अंगावर घालून ८ ते ९ जणांना उडवले

June 3, 202677

विधानपरिषदेत शिवसेनेची माघार; प्रतापराव पाटलांचा ‘महायुती धर्म’ पाळत निवडणूक न लढवण्याचा निर्णय!

June 1, 202661
© 2026 Aakhada Live. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.