Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Aakhada
जळगाव (मंगेश चौधरी) : राज्यात आगामी विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुतीच्या जागावाटपात जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट) यांच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशातच, शिवसेनेचे युवा नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आले असून नव्या समीकरणांची नांदी सुरू झाली आहे.सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि कामाचा दांडगा अनुभव :पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा राजकीय वारसा लाभलेले प्रतापराव पाटील यांनी गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. केवळ वारशावर विसंबून न राहता त्यांनी वैयक्तिक कार्यशैली, दांडगा जनसंपर्क आणि कुशल संघटन…
जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत चर्चेचा विषय ठरलेल्या जळगाव विधानपरिषद जागेचा तिढा अखेर सुटल्याची माहिती समोर आली आहे. आखाड्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव विधानपरिषदेची जागा ही शिवसेनेला देण्यात आली असून भाजपने या जागेवरून माघार घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपने नाशिकची जागा आपल्या पदरात पाडून घेतली आहे.दरम्यान, जळगावची जागा शिवसेनेला सुटल्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्या उमेदवारीवर आता जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.महायुतीत जळगावची जागा भाजपकडे जाणार की शिवसेनेकडे, याबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र अखेर हा तिढा सुटल्याने राजकीय हालचालींना वेग…
आखाडा न्यूज | जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये या जागेवरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जोरदार प्रतिष्ठेची लढाई सुरू असताना, विरोधी पक्षांची ‘महाविकास आघाडी’ (मविआ) मात्र सध्या कमालीच्या शांततेत रणनीती आखत आहे. मविआने अद्याप आपला कोणताही उमेदवार जाहीर न करता ‘आधी महायुतीला पत्ता उघडू द्या, मगच आम्ही चाल खेळू’ अशी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्याचे चित्र आहे.मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, महाविकास आघाडीचे स्थानिक आणि वरिष्ठ नेते महायुतीमधील अंतर्गत कुरघोडीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ही जागा नेमकी कोणाच्या पदरात पडते—भाजप की शिंदे गट—यावरच मविआचा पुढील डाव अवलंबून…
२८ मे पासून जळगावकरांच्या मातीत सुरु होणार बातम्यांचा आखाडा…आखाडा लाईव्ह…ना कुणाची भीती, ना कुणाची धास्ती!हा आखाडा केवळ सत्ता आणि राजकारणाचा नाही, तर हा आखाडा आहे… जळगावच्या शाश्वत विकासाचा! हा आखाडा आहे… पर्यावरणाच्या रक्षणाचा आणि तापी-गिरणेच्या संवर्धनाचा!इथे घुमणार आवाज… सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा, इथे मांडला जाणार हिशोब… शेतकऱ्यांच्या घामाचा! वन्यजीवांचे रक्षण, महिलांचे हक्काचे व्यासपीठ आणि तरुणाईच्या बुलंद आवाजाचा… हा आखाडा आहे… थेट तुमच्या-आमच्या मातीचा!बघायला विसरू नका… ‘आखाडा लाईव्ह’ – सत्य, रोखठोक आणि थेट!

