जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत चर्चेचा विषय ठरलेल्या जळगाव विधानपरिषद जागेचा तिढा अखेर सुटल्याची माहिती समोर आली आहे. आखाड्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव विधानपरिषदेची जागा ही शिवसेनेला देण्यात आली असून भाजपने या जागेवरून माघार घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपने नाशिकची जागा आपल्या पदरात पाडून घेतली आहे.
दरम्यान, जळगावची जागा शिवसेनेला सुटल्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्या उमेदवारीवर आता जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीत जळगावची जागा भाजपकडे जाणार की शिवसेनेकडे, याबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र अखेर हा तिढा सुटल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
आता शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात महाविकास आघाडी उमेदवार देणार का, की एखादा अपक्ष उमेदवार रिंगणात उतरणार, अथवा ही जागा बिनविरोध होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.


