आखाडा | (Exclusive) जळगाव : नाशिक मध्ये भाजपने शिवसेना विरोधात बंडखोरी केल्यानंतर, नाशिकच्या बदला फेडण्यासाठी शिवसेनेने जळगाव मध्ये भाजप उमेदवाराविरोधात रेशमा काळे यांना उभे करत भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. तसेच जोपर्यंत नाशिकमध्ये भाजप बंडखोर उमेदवार गोकुळ गीते माघार घेणार नाहीत, तोपर्यंत जळगाव मध्ये ही रेश्मा काळे या माघार घेणार नसतेची भूमिका शिवसेनेने घेतली होती..
अखेर आता भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांच्या शिष्टाईनंतर नाशिक मध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी जाहीर माघार घेतली आहे. त्यानंतर आता जळगाव मध्येही शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे या माघार घेणार असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. शुक्रवार, १२ जून रोजी सकाळी ११ वाजता भाजप कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील व भाजपचे नेते राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत, रेशमा काळे यांची जाहीर माघार होणार आहे. गीते यांच्या माघारी नंतर रेश्मा काळे या माघार घेतील का नाही याबाबत प्रसार माध्यमांकडून, काळे यांना विचारले असता काळे यांनी आपण माघार घेणार नसल्याचे सांगितले होते. मात्र पक्षाने दिलेल्या सूचनेनंतर उद्या त्यांची माघार निश्चित झाली आहे.


