Close Menu
AakhadaAakhada
  • Home
  • सामाजिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • क्रीडा
  • पर्यावरण
  • मनोरंजन
  • व्यापार-उद्योग
  • शैक्षणिक
  • सांस्कृतिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जळगावात अल्पवयीन मुलाचा बेदरकारपणा; सुसाट कार अंगावर घालून ८ ते ९ जणांना उडवले

June 3, 2026

वाळू माफियांची पोलिसांसमोरच दादागिरी; दापोऱ्यात गावकऱ्यांना तलवार-कुऱ्हाडीचा धाक!

June 3, 2026

गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांचा आग्रह डावलून नंदकिशोर महाजन यांना मिळाली उमेदवारी…?

June 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
AakhadaAakhada
Button
  • Home
  • सामाजिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • क्रीडा
  • पर्यावरण
  • मनोरंजन
  • व्यापार-उद्योग
  • शैक्षणिक
  • सांस्कृतिक
AakhadaAakhada
Home»कृषी»महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय: ३६ हजार कोटींची ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना’ मंजूर….
कृषी

महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय: ३६ हजार कोटींची ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना’ मंजूर….

५६ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
Team AakhadaBy Team AakhadaJune 2, 2026No Comments50 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आखाडा | (विशेष प्रतिनिधी) मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज २ जून रोजी राज्य मंत्रिमंडळाची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील बळीराजासाठी अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार, राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना’ लागू करण्यास मंत्रिमंडळाने अधिकृत मंजुरी दिली आहे.

३६ हजार ५८५ कोटींची कर्जमाफी, ६५ लाख खाती होणार नील

या योजनेअंतर्गत राज्य सरकार तब्बल ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी देणार असून, यामुळे राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे ६५ लाखांहून अधिक कर्जखात्यांवरचे कर्ज माफ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकार शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार आहे.

नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन

केवळ थकबाकीदारच नव्हे, तर प्रामाणिकपणे आणि नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारने मोठा दिलासा दिला आहे. अशा नियमित कर्ज भरणार्‍या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहननिधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

आचारसंहितेमुळे अधिकृत घोषणा नाही, पण परिपत्रक निघणार

सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाने या निर्णयाच्या जाहीर घोषणेला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत निर्णय होऊनही त्याची थेट घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, कर्जमाफी संदर्भात सहकार विभाग लवकरच अटी व शर्तींचे परिपत्रक (G.R.) काढणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरू केली जाईल.

थोडक्यात काय तर…

अर्थसंकल्पातील घोषणेनंतर गठीत केलेल्या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर आज मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. आचारसंहितेचा तांत्रिक अडसर असला तरी, प्रशासकीय पातळीवर सहकार विभागाच्या परिपत्रकासह कर्जमाफीच्या अंमलबजावणीची तयारी पूर्ण झाली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team Aakhada
  • Website

Related Posts

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आज होणार, पण घोषणा नाही;

June 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांचा आग्रह डावलून नंदकिशोर महाजन यांना मिळाली उमेदवारी…?

June 3, 2026106

जळगावात अल्पवयीन मुलाचा बेदरकारपणा; सुसाट कार अंगावर घालून ८ ते ९ जणांना उडवले

June 3, 202683

विधानपरिषदेत शिवसेनेची माघार; प्रतापराव पाटलांचा ‘महायुती धर्म’ पाळत निवडणूक न लढवण्याचा निर्णय!

June 1, 202661

महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय: ३६ हजार कोटींची ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना’ मंजूर….

June 2, 202650
Don't Miss
क्राईम

जळगावात अल्पवयीन मुलाचा बेदरकारपणा; सुसाट कार अंगावर घालून ८ ते ९ जणांना उडवले

By Team AakhadaJune 3, 202683

आखाडा लाईव्ह | जळगाव :अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देण्याचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात, याची…

वाळू माफियांची पोलिसांसमोरच दादागिरी; दापोऱ्यात गावकऱ्यांना तलवार-कुऱ्हाडीचा धाक!

June 3, 2026

गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांचा आग्रह डावलून नंदकिशोर महाजन यांना मिळाली उमेदवारी…?

June 3, 2026

विधान परिषदेच्या धामधुमीत जिल्ह्यात होणार अनेक दिग्गजांचे पक्षांतर

June 3, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
Our Picks

जळगावात अल्पवयीन मुलाचा बेदरकारपणा; सुसाट कार अंगावर घालून ८ ते ९ जणांना उडवले

June 3, 2026

वाळू माफियांची पोलिसांसमोरच दादागिरी; दापोऱ्यात गावकऱ्यांना तलवार-कुऱ्हाडीचा धाक!

June 3, 2026

गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांचा आग्रह डावलून नंदकिशोर महाजन यांना मिळाली उमेदवारी…?

June 3, 2026
Most Popular

गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांचा आग्रह डावलून नंदकिशोर महाजन यांना मिळाली उमेदवारी…?

June 3, 2026106

जळगावात अल्पवयीन मुलाचा बेदरकारपणा; सुसाट कार अंगावर घालून ८ ते ९ जणांना उडवले

June 3, 202683

विधानपरिषदेत शिवसेनेची माघार; प्रतापराव पाटलांचा ‘महायुती धर्म’ पाळत निवडणूक न लढवण्याचा निर्णय!

June 1, 202661
© 2026 Aakhada Live. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.